
कऱ्हाड : नागरीवस्तीत शिरून बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना काले- कालवडे रस्त्यावर कालवडे नावाच्या माळ शिवारात घडली. पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या घटनेत सुभाष यादव यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्रा बिबट्याने फस्त केला. संबंधित घटना घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.