
सातारा : जम्मू-काश्मीर येथे पुंछ भागातील बलनोई येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले कामेरी (ता. सातारा) गावचे सुपुत्र शुभम समाधान घाडगे (वय २८) यांना आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला. हुतात्मा जवान यांच्या पार्थिवाला भाऊ विजय यांनी मुखाग्नी दिल्यानंतर जमलेल्या हजारो नागरिकांनी ‘अमर रहे, अमर रहे, शहीद जवान शुभम घाडगे अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. मराठा लाइट इन्फन्ट्रीचे जवान व पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.