Kanchan Salunkhe announcing her hunger strike protest demanding Shivendra Rajen as Sattara's Guardian Minister.Sakal
सातारा
Kanchan Salunkhe : शिवेंद्रराजेंनाच साताऱ्याचे पालकमंत्री करा : कांचन साळुंखे; अन्यथा २६ जानेवारीला उपोषण
Satara News : शिवेंद्रसिंहराजे हे सर्वसमावेश नेतृत्व असल्याने गादीचा मान राखून सध्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी. भारतीय जनता पक्षाने २६ जानेवारीला ध्वजवंदनाचा मान पालकमंत्री म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच द्यावा.
सातारा : विधानसभा निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्यात दोन नंबरचे मताधिक्य मिळाले आहे. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक आमदार, त्या पक्षाचा पालकमंत्री असा नियम राज्यात सगळीकडे असताना साताऱ्यात हा नियम लागू न करता शंभूराज देसाईंना पालकमंत्री केले.

