Karad Crime : कऱ्हाडला दहा गुन्हेगारांच्या टोळीकडून १४ पिस्तुलासह २२ काडतुसे जप्त

कऱ्हाड शहर व परिसरातील गुन्हेगारीशी संबधीत दहा संशयीतांवर कारवाई करत पोलिसांनी नऊ लाखांच्या १४ पिस्तुल व २२ जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केल्या.
Karad Crime
Karad Crimesakal
Summary

कऱ्हाड शहर व परिसरातील गुन्हेगारीशी संबधीत दहा संशयीतांवर कारवाई करत पोलिसांनी नऊ लाखांच्या १४ पिस्तुल व २२ जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केल्या.

- सचिन शिंदे

कऱ्हाड - शहर व परिसरातील गुन्हेगारीशी संबधीत दहा संशयीतांवर कारवाई करत पोलिसांनी नऊ लाखांच्या १४ पिस्तुल व २२ जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केल्या. एकाच रात्री इतक्या मोठ्या प्रमाणात पिस्तुल जप्त होण्याची कारवाई जिल्ह्यातील सर्वात मोठी ठरली आहे. संबधित टोळी परिसरात दरोड्याच्या तयारीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काल रात्री जेरबंद केले. त्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या पिस्तुल कोठून आणल्या, त्यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे, याचा सगळा तपास करणार असल्याचे यावेळी श्री. शेख यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी सांगितले की, या टोळीतील संशयीतांकडून पिस्तुलासह जीवंत काडतुसे, मिरची पुड, कोयता जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात दरोडा टाकण्याच्या पुर्व तयारीचा गुन्हा नोंदवला आहे. सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी) अमीत हणमंत कदम (रा. अंतवडी), अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी कऱ्हाड), धनंजय मारुती वाटकर (रा.सैदापूर-कऱ्हाड), वाहीद बाबासाहेब मुल्ला (रा. विंग), हर्ष अनिल चंदवानी व रिजवान रज्जाक नदाफ (दोघे, रा. मलकापूर), चेतन शाम देवकुळे , बजरंग सुरेश माने (दोघे, रा. बुधवार पेठ) व किशोर पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीतील बहुतांशी संशयीतांचे पोलिसांकडे गुन्हयाचे रेकॉर् आहे. कऱ्हाड व परिसरात पिस्तुल आल्याची माहिती एळसीबीला मिळाली होती.

त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शहरात कोंबींग ऑपरेशन राबवले. त्याचवेळी पोलीस निरीक्षक देवकर यांना बातमीदारामार्फत कऱ्हाड - विटा रस्त्यावरील राजमाचीच्या हद्दीत जानाई मळाई मंदिराजवळ काही लोक जमल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रस्त्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेताच्या जवळ ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, असेही समजडले होते. त्यानुसार ते पथकास घेवून त्या बाजूला रवाना झाले. त्यावेळी त्यांना त्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी अन्य अधिकारी व पोलीसांना दोन पंचांसह बोलावले. त्यानुसार उसाच्या शेतालगत आडोशास बसलेल्या दहा जणांना पकडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चाहुल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांना ताणून पकडले. त्यांवेळी त्यांच्या ताब्यातून नऊ लाख ११ हजार ९०० रूपयांच्या १४ देशी बनावटीच्या पिस्तुल व २२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Karad Crime
Satara News : साताऱ्यातील युवकांत रावण गँगची दहशत

रात्रभर जागली एलसीबी

संशयीतांकडून १४ देशी बनावटीच्या पिस्तुलासह २२ काडतुसे जप्त करण्यासाठी एलसीबी रात्रभर जागली. अधीक्षक शेख, अपर अधीक्षक बापू बांगर यांनी सकाळी त्यांचे कौतुक केले. उपाधीक्षक रणजित पाटील, अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, एलसीबीचे अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने कारवाई केली. पथकात हवालदार संतोष पवार, रविंद्र भोरे, अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, निलेश काटकर, मोहन पवार, लक्ष्मण जगधने, प्रविण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, वैभव सावंत, गणेश कापरे, संभाजी साळूंखे, पंकज बेसके, येळवे, कुलदिप कोळी, अमित वाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com