
कऱ्हाड : नुकत्याच झालेल्या विधानसभेची निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील फेरफार आदी मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या तब्बल ७० उमेदवारांकडून वेगवेगळ्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा समावेश आहे.