

Trouble Over Political Endorsement: 35 Karad Employees Face Action
Sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड: पालिकेच्या स्विकृत नगरसवेकपदाच्या निवडीवेळी माजी मंत्र्यांची भेट घेवून माजी उपाध्यक्षांना स्विकृत नगरसवेकपद द्यावे, अशी शिफारस करण्यासाठी पालिकेतील कर्मचाऱ्यांनी माजी मंत्र्यांची भेट घवून केली होती. पालिका कर्मचाऱ्यांची ही कृती म्हणजे राजकीय हस्तक्षेप आहे, अशी तक्रार पालिकेत झाली आहे. त्यामुळे स्विकृत नगरसेवकपदाच्या शिफारशीसाठी माजी मंत्र्याची भेट घेणाऱ्यापैकी ३५ पालिका कर्माचाऱ्यांना मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. त्यात चोवीस तासात खुलासा कारवा, असेही नोटीशीत म्हटले असून खुलासा न आल्यास कार्यवाही केली जाईल, असा इशाराही दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या नोटीसीमुळे पालिकेसह शहरात खळबळ उडाली आहे.