esakal | कऱ्हाड बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाड बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना

कऱ्हाड बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास शेती उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या शेत माल तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती महादेव देसाई यांनी केले आहे.

बाजार समितीच्यावतीने सन 2021-22 या आर्थिक वर्षात उत्पादित शेत मालास कर्ज सुविधा सुरू केली आहे. त्याची माहिती देताना ते बोलत होते. बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार कदम, सचिव बी. डी. निंबाळकर उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, शेतमालास जास्त बाजार भाव मिळण्यासाठी शेती उत्पन्न बाजार समितीने 2018 -19 या आर्थिक वर्षापासून शेतीमाल तारण कर्ज योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये शासकीय धोरणानुसार 70 टक्के रक्कम सहा टक्के व्याजदराने बाजार समितीच्या स्वनिधीतून शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते.

स्थानिक पातळीवर शेतीमाल साठवणुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने आणि पैशाच्या गरजेपोटी शेतकरी सुगी नंतर लगेचच शेतमाल विकतात त्याच दरम्यान एकाच प्रकारचा शेतमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे दर गडगडतात योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. काढणी हंगामात शेतीमालाची साठवणूक करून काही कालावधीनंतर तो बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास जादा भाव मिळू शकतो. शेतकऱ्यांना सुगीच्या काळात असलेली आर्थिक निकड लक्षात घेऊन गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येत आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

loading image
go to top