कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे. आज ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असून, त्यातून कृषीविषयक माहिती, बाजारभाव व विविध शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. शेतीमध्ये अत्याधुनिक अवजारे व एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि त्यात कऱ्हाडच्या कृषी प्रदर्शनाचे योगदान असेल, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.