CRPF DG Amol Homkar
sakal
कऱ्हाड - कऱ्हाडचे सुपुत्र व टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी, आयपीएस अधिकारी अमोल विनुकांत होमकर यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) महानिरीक्षकपदी केंद्रीय प्रतिनियुक्ती झाली असून, त्यांच्यावर मणिपूर आणि नागालँड या दोन संवेदनशील राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कऱ्हाडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.