
कऱ्हाड : अवैध दारूविक्रीप्रकरणी तडजोड करून पुन्हा दारूविक्री सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याने सहा हजारांची लाच मागितली. त्यातील पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता त्याच्या साथीदाराकडे देताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.