Karad Police Case
सातारा
Karad Police : कराडात राडा! मतदानादिवशी खुन्नस दिल्याच्या कारणावरून वाद; १० जणांवर गुन्हा
Election Day Dispute Leads to Violence in Karad : कराडमध्ये पालिका निवडणुकीनंतर किरकोळ वादातून दोन गल्लीतील दहा जणांत मारामारी झाली. परस्पर तक्रारी शहर पोलिसांत दाखल झाल्या असून निवडणूक रागातून हा वाद वाढल्याचे नमूद आहे.
कऱ्हाड : पालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी एकमेकाकडे बघण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे गुरुवारी रात्री मारामारीत रूपांतर झाले. एकमेकांना भिडलेल्या पावसकर व कुंभार गल्लीतील दहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात (Karad Police Case) परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
