
कऱ्हाड : शहरासह तालुक्याला काल गारांसह वादळी वारा व मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वाहतूक विस्कळित झाली. वादळी वाऱ्याने शहरासह तालुक्यातील ३० पक्क्या घरांची पडझड झाली. ३३ पत्र्यांची घरे, शेडचेही नुकसान झाले. जनावरांच्या २२ गोठ्यांची पडझड झाली. पावसाने पाणी साचून वीटभट्टी चालकांचे, तसेच पिकांचेही नुकसान झाले. मात्र, अद्याप त्याचे पंचनामे सुरू केले नाहीत.