

The Food and Drug Administration sealed two hotels in Karad after complaints of food safety violations, while action against three more establishments is underway.
कऱ्हाड : अन्न व औषध प्रशासन आयुक्त मुंडे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलवर शहरातील काही हॉटेलबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील विविध हॉटेलची अचानक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईत दोन हॉटेलमध्ये मुदतबाह्य थंड पेयाची विक्री व अन्य काही संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधित हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अन्य तीन हॉटेलांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.