कऱ्हाड : पुणे-बंगळुरु महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यानच्या उड्डाणपूल उभारणीचे काम (Karad Flyover Construction) अंतिम टप्प्यात आहे. पुलावर सेगमेंट बसवण्यासाठी त्याच्यावर गर्डर बसवण्यात आले आहेत. पुलाच्या सेगमेंटचे काम झाल्याने आता कोल्हापूर नाका आणि ढेबेवाडी फाटा येथील गर्डर खाली उतरण्याची कार्यवाही ठेकेदार कंपनीकडून आजपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यावरुन कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील कोयना पूल ते जखिणवाडी दरम्यान आणि कोल्हापूरहून पुण्याकडे जाताना जखिणवाडी ते कोयना पूल दरम्यान एकेरी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.