Jaysingpur businessman kidnapping near Karad, cash and gold looted
कऱ्हाड : जयसिंगपूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील पेपर अॅण्ड पेपर प्रोडक्टस व्यवसायिक निकेत श्रीभगवान बियाणी (वय ४३) यांचे कऱ्हाडजवळील पाचवडफाटा येथे अपहरण करून त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्याची चैन लुटत कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चार अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीसांनी दिली.