Karad Kolhapur Naka flyover night traffic
esakal
कराड : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडजवळील (जि. सातारा) कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील स्ट्रीटलाईटची दोन दिवस जनरेटवर त्या सुरु करुन चाचणी घेण्यात येत आहे. ती चाचणी पूर्ण झाल्यावर उड्डाणपुलावरुन रात्रीचीही वाहतूक सुरु करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सध्या पुलावरुन चाचणीसाठी रात्रीही वाहतूक सुरु (Karad Nandlapur flyover latest news) आहे. त्यामुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधाकांना मोठा दिलासा मिळणार आहे.