Yellow Wagtail bird deaths in Maharashtra
esakal
सातारा : कराड येथील कोयना नदीपात्रात ३५ हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नदीकाठच्या परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या कासवाजवळ जमलेल्या ‘पिवळा धोबी’ (Yellow Wagtail) प्रजातीच्या पक्ष्यांचा काही मिनिटांतच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वनविभाग सतर्क झाला (Yellow Wagtail bird deaths in Maharashtra) आहे.