Indian Army Jawan Dies
esakal
कऱ्हाड : भारतीय सैन्य दलातील Maratha Light Infantry मध्ये कार्यरत असलेले जवान सोमनाथ शामराव सुर्वे (वय ४७) यांचे पंजाबमधील चंदीगड येथे सेवा बजावताना हृदयविकाराच्या धक्क्याने (Chandigarh Heart Attack) निधन झाले. ते मूळचे कऱ्हाड तालुक्यातील आबईचीवाडी गावचे सुपुत्र होते. उद्या (शुक्रवारी) त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.