

Karad Maratha Community Holds Road Blockade For Reservation Warns Of Major Pune Bengaluru Highway Protest
sakal
कऱ्हाड: एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, सगे-सोयरे निकष लागू झालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय या ना अशा घोषण देत मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली-सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने आज येथील वारुंजी फाट्यावर कऱ्हाड-चिपळूण मार्ग रोखला. जरांगे-पाटील यांच्या मागण्यावर सरकारने तातडीने विचार न केल्यास पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशाराही यावेळी दिला.