esakal | बाजारपेठेसह मंडई, किराणा दुकानांत Social Distance चा फज्जा
sakal

बोलून बातमी शोधा

Karad City

बाजारपेठेसह मंडई, किराणा दुकानांत Social Distance चा फज्जा

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बुधवारी जीवनावश्‍यक वस्तूंसह अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेतील विविध दुकानांसह किराणा माल दुकानांतही नागरिकांनी रांगा लावून खरेदी केली. गर्दीमुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडालाच, त्याशिवाय शहरातील मुख्य बाजारपेठेतही वाहतुकीची दिवसभर कोंडी झाली होती.

राज्य सरकारने बुधवारपासून 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी सोशल डिस्टन्ससह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे शासनाने आवाहन केले आहे. तरीही नागरिकांनी मंगळवारी दिवसभर शहरात विविध वस्तू खरेदीला गर्दी केली होती.

हेही वाचा : UPSC परीक्षा जवळ आली असतानाच वडिलांना कोरोनाची बाधा झाली. त्यांना ICU त ठेवले, पुढे काय झाले वाचा सविस्तर

या वेळी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली तर झालीच, त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. दत्त चौकापासून चावडी चौकाकडे व पुन्हा तेथून मंगळवार पेठेकडील मुख्य मार्गावर गर्दी होती. अनेकांनी खरेदीसाठी वाहने आणली होती. ती रस्त्यात पार्क केल्याने कोंडी वाढली होती. वाहतूक शाखेने त्यातील काहींना दंडही केला. खरेदी करतानाही नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे संसर्गाची भीती व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Edited By : Siddharth Latkar