esakal | गुन्हेगारांवर वचक निर्माण करुन जनतेचा विश्वास जिंका : पृथ्वीराज चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगारांवर वचक निर्माण करुन जनतेचा विश्वास जिंका : पृथ्वीराज चव्हाण

सध्याच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. कोरोना काळात नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्यामध्ये जागृती करून गर्दी टाळण्याचे मोठे प्रयत्न पोलिस प्रशासनाला करावे लागणार असल्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर वचक निर्माण करुन जनतेचा विश्वास जिंका : पृथ्वीराज चव्हाण

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : गुन्हेगारांवर वचक निर्माण करून सामान्यांचा विश्वास जिंकण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी आमदार चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार चव्हाण यांनी पोलिस उपअधीक्षक पाटील यांचे स्वागत केले. या वेळी मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण, गजानन आवळकर उपस्थित होते. 

आमदार चव्हाण व पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. कोरोनाची सद्य:स्थितीवरही चर्चा झाली. या वेळी आमदार चव्हाण म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. कोरोना काळात नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्यामध्ये जागृती करून गर्दी टाळण्याचे मोठे प्रयत्न पोलिस प्रशासनाला करावे लागणार आहेत. डॉ. पाटील यांनी याआधी गडचिरोली व रायगड जिल्ह्यात काम केले आहे. जनतेचा विश्वास संपादन करून जनतेमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल आपुलकी व गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, अशी यंत्रणा उभारणे आवश्‍यक आहे.'' 

नगराध्यक्षांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का?; कॉंग्रेसचा हल्लाबोल

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top