Karad Crime News
esakal
कऱ्हाड (जि. सातारा) : येथील बस स्थानक परिसरात एका मोबाईलच्या दुकानात नवीन मोबाईल बदलून देण्यावरुन झालेल्या वादावादीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अखिलेश नलवडे (वय २१, गजानन सोसायटी, कऱ्हाड) असे या मृत युवकाचे नाव असल्याची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांनी दिली. या प्रकाराने कऱ्हाडमध्ये खळबळ उडाली आहे.