कऱ्हाडकरांनाे! आता तुमच्याच हातात पालिकेच्या तिजाेरीची जबाबदारी

सचिन शिंदे
Thursday, 5 November 2020

पालिका अपेक्षित उत्पन्नावर आधारित कामांची तरतूद करते. त्यामुळे ते गणीत फसत आहे. पालिका खर्चाची तरतुदी जेवढी आहे, त्यापेक्षा जास्त तरतूद केल्याने वरच्या उरलेल्या तरतुदीमुळे निर्माण झालेले देणे भागवताना पालिकेला नाकेनऊ येत आहे.

कऱ्हाड : पालिकेच्या जनरल फंडात पुन्हा पैशाची तंगी वाढली आहे. त्यामुळे पालिकेवर आर्थिक ताण आला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पालिका ठेकेदारांसह सर्वांना मिळून तब्बल 18 कोटींचे देणे आहे. देणी भागविण्यासाठी पालिकेकडे निव्वळ एक कोटीच्या आसपास रक्कम जनरल फंडात शिल्लक आहे. त्यामुळे पालिकेवर आर्थिक ताण आला आहे. त्या ताणातून बाहेर पडण्यासाठी पालिकेला किमान वर्षाचा कालवधी लागणार आहे. पालिकेला कराच्या माध्यातून तब्बल 18 कोटी येणे बाकी आहे. त्यातील सव्वा तीन कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे त्याचा थोडाफार दिलासा मिळणार असला, तरी आर्थिक स्थिती सुस्थितीत व्हावी, यासाठी पालिकेला आर्थिक नियोजन करावे लागणार आहे.
 
कऱ्हाड पालिकेचे तीन वर्षांपासून आर्थिक नियोजन फिसकटल्यासारखे झाल्याने पालिकेची आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. त्यामुळे पालिकेवर आर्थिक संकटाची तलवार आहे. अवाजवी खर्चासह अन्य कामे जनरल फंडातून केल्याने पालिका आर्थिक कोंडीत अडकली आहे. त्यामुळे पालिकेच्या जनरल फंडात मोजकीच शिल्लक आहे. वेगवेगळ्या कामांचे सुमारे 18 कोटींच्या आसपास पालिकेला देणे झाले आहे. मात्र, जनरल फंडात पैसाच नसल्याने ती देणी भागवणे अशक्‍य झाले आहे. त्याचे नियोजन पालिकेच्या अर्थसंकल्पात होण्याची गरज आहे. त्यावर केवळ चर्चा घडविण्यापेक्षा ठोस उपाययोजनांचा ऊहापोह होण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या काळात पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होईल, अशी स्थिती आहे. पालिकेत अनुदान न आल्याने पगार, पेन्शनचे सहा कोटी, तर ठेकेदारांची देणी तीन कोटी 84 लाख 84 हजार देणी बाकी आहेत. त्यात अनुदानातर पगाराचे देणी भागवली जातीलही मात्र ठेकेदारांची बिले भागवायची कशी असा प्रश्न पालिकेसमोर आहे. त्याशिवाय अन्य देणी पाहाता पालिकेचे एकूण 18 कोटींचे देणे बाकी आहे. त्यामुळे त्याचा ताळेबंद लावताना पालिकेला कसरत करावी लागणार आहे. पालिकेला कर रूपाने तब्बल 18 कोटी येणे बाकी आहे. त्यातील सव्वातीन कोटींची वसुली झाली आहे.

व्यापा-यांसह सर्वांनाच घरपट्टीत सवलत द्या : शिवेंद्रसिंहराजे  

आभासी आकड्यांचा खेळ 

पालिकेतील अंदाजपत्रकात आभासी आकड्यांच्या नियोजनाचा खेळ आर्थिक नियोजन फिसकटण्यास जबाबदार आहे. जनरल फंडातील पैसा मोठ्या प्रमाणात वापरला गेल्याने आज फंडात पैसाच नाही. त्यामुळे देणी भागवायची कशी, असा प्रश्न पालिकेसमोर आहे. पालिका अपेक्षित उत्पन्नावर आधारित कामांची तरतूद करते. त्यामुळे ते गणीत फसत आहे. पालिका खर्चाची तरतुदी जेवढी आहे, त्यापेक्षा जास्त तरतूद केल्याने वरच्या उरलेल्या तरतुदीमुळे निर्माण झालेले देणे भागवताना पालिकेला नाकेनऊ येत आहे. 

पालिकेचा आर्थिक डोलारा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जनरल फंडात पैसे कमी आहेत. त्यामुळे ही स्थिती झाली आहे. त्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य केल्यास याही स्थितीतून आपण सावरू सकतो. केवळ चर्चा न करता आर्थिक नियोजनाची ठोस पावले उचलत आहोत. त्यासाठी थोडा कालावधी निश्‍चित जाईल. मात्र, आर्थिक नियोजन चांगले होईल.

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

भाजपला ‘लक्ष्य’ करण्यासाठी दोघा ‘एकनाथां’सह ‘गुलाब’ही 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Muncipal Council Appeals Citizens To Pay House Tax Satara News