पालिकेच्या सभेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा हाेणार का? कऱ्हाडकरांना शंका

सचिन शिंदे
Monday, 21 September 2020

अन्य विषयांवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणे शक्‍य नसल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे सभा नक्की कशी होणार, याबाबतही नागरिकांत उत्सुकता आहे.

कऱ्हाड : सात महिन्यांनी पालिकेची सर्वसाधारण सभा आज (सोमवारी) होत आहेत. त्यात तब्बल 120 विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र, ती सभा ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे चर्चेलाही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा न घेताच निर्णय होणार असेल तर सत्ताधारीसह विरोधी आघाडीचे नगरसेवक त्यावर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष आहे. पालिकेने काढलेल्या जम्बो विषयांच्या अजेंड्यावर चर्चा होणार की नाही, याचीच सध्या जोरदार चर्चा आहे.
कऱ्हाडच्या सैदापुरात कडकडीत बंद 

पालिकेची सभा तब्बल सात महिन्यांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी झाली होती. त्यानंतर दोन विशेष सभा झाल्या, मात्र त्यात फारशी चर्चा झाली नाही. त्यानंतर आज (सोमवारी) सभा होत आहे. यामध्ये रस्ते, गटारे, विविध कामांना मंजुरीबरोबर कोरोना कालावधी असेपर्यंत विषाणू प्रतिबंधासाठी काम करत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांसाठी व नागरी आरोग्य केंद्राच्या डॉक्‍टर, आशा स्वयंसेविकांना प्रतिमहा प्रोत्साहन भत्ता आदी विषयांवर चर्चा होवून मंजूर होतील. मात्र, अन्य विषयांवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणे शक्‍य नसल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे सभा नक्की कशी होणार, याबाबतही नागरिकांत उत्सुकता आहे. सारासार विषयावर चर्चा होईलही; मात्र महत्त्वाचे विषय मात्र सविस्तर चर्चा न होताच मंजूर करण्यासाठी तर सभा आयोजित केली नाही ना, अशीच शंका येण्यास वाव आहे.

राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो; पाचगणीच्या विकासाची वाट मोकळी
 
सभेत इदगाह मैदानात तात्पुरते वेटिंग शेड उभारणे, भाजी मंडईचा बाजारकर वसुली ठेक्‍यावर चर्चा करणे, हॉकर्स झोनची जागा निश्‍चित करणे, विविध ठिकाणी पाइपलाइन करणे, यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल मुदतवाढ, शहरांतर्गतसह वाढीव हद्दीतील विविध रस्त्यांची कामे, शहरातील विविध ठिकाणी पार्किंग झोन तयार करणे आदी महत्त्वाचे विषय आहेत.

ब्रेकअप, नैराश्य आणि मितवा : आयुष्याकडं सकारात्मकतेनं बघायला काय हरकत आहे? 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Muncipal Council General Meeting Satara News