Karad Municipal Election
esakal
कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड (नगरपालिकेच्या निवडणुकीचा (Karad Municipal Election) ज्वर चांगलाच वाढला आहे. उमेदवारांच्या प्रचार सभा, रॅली, पदयात्रा याने वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच प्रत्येकजण आपण निवडून कसे येईल यावर जोर देत आहे. मात्र, कऱ्हाड येथील नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार अॅड. श्रीकांत घोडके हे चक्क 'मला मतदान करु नका' असा प्रचार करत आहेत. त्यामुळे आश्चर्यच व्यक्त होत आहे.