esakal | Karad : पालिकेच्या जनरल फंडावर भार न टाकण्याचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

karad municipality

Karad : पालिकेच्या जनरल फंडावर भार न टाकण्याचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पालिकेच्या जनरल फंडातील आर्थिक टंचाई लक्षात घेता कोणतीही कामे त्या फंडातून न करता शासकीय विविध योजनेतून ती कामे करण्यात यावीत, त्या कामांना सर्वसाधरण सभेत मंजूरीनंतर उपलब्ध निधीनुसार योजनेत वर्ग करावीत, यावर पालिकेच्या आघाड्यांच्या गटनेत्यांच्या बैठकीत एकमत झाले. दै. सकाळनेही पालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करणाऱ्या तोकडी शिल्लक, कोटीत देणी, या वृत्ताची दखल घेवून बैठकीत चर्चा झाली. त्या वृत्तानुसारही बैठकीत निर्णय घेण्यात आले.

नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, भाजपचे गट नेते विनायक पावसकर यांची एकत्रीत बैठक झाली. त्यात विविध विषयांवरही चर्चा झाली. पालिकेच्या परवा झालेल्या विशेष सभा झाली. त्यापूर्वीच्या सभेत सर्वांनी एकत्रीत बसून चर्चा करून विषय अंतीम करण्याचे ठरले होते. त्यानुसार चर्चा न होताच थेट विशेष सभा काढली गेली. सभेत त्यावर लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी चर्चा घडवली. जनशक्ती आघाडीचे गटनेते यादव व भाजपच्या नगरसवेकांनीही चर्चेत सहभाग गेतला. शहराच्या हिताच्या विषयांवर चर्चा करून ते विषय अंतीम केल्यास सभेतही सकारात्मक चर्चा होवून विषय मार्गी लागतात. त्यामुळे विषयांसाठी एकत्रीत बसण्याची भुमिका लोकशाही आघाडीचे गटनेते पाटील यांनी वर्षापूर्वी घेतली. त्यानुसार आज बैठक झाली.

बैठकीत जनरल फंडात निधीवर बराच काल चर्चा झाली. त्यात दै. सकाळच्या तोकडी शिल्लक, कोटीत देणी.. या वृत्ताचीही दखल घेवून सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार जनरल फंडावर भार न टाकण्याचा निर्णय झाला. कामे मंजूर करून ती अन्य योजनेतून निधी करण्यावर एकमत आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचा उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले पालिकेतील आघाड्याचे गटनेते व आम्ही विविध विकास कामांवर चर्चा करण्यासाठी एकत्रीत बसलो. बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. पालिकेची विविध विकास कामे वेगवेगळ्या फंडातून करणार आहे. जनरल फंडात पैसे नसल्याने ती अन्य योजनेतून करण्यात येतील, त्यावरही चर्चा झाली आहे.

"पालिकेच्या जनरल फंडात निधी कमी आहे. त्यावर लोकशाही आघाडीने सतत चर्चा घडवत आहे. आघाड्यांचे नेते, नगराध्यक्षा, उपाध्यक्षा यांची समन्वयाची आज बैठक झाली. त्या बैठकीत त्या विषयावर चर्चा झाली आहे. त्यामुळे जनरल फंडातून कामे न करण्याचा निर्णय झाला आहे. अन्य कामे विविध योजनेतून करण्यात येणार आहे."

- सौरभ पाटील, गटनेते, लोकशाही आघाडी

loading image
go to top