esakal | कऱ्हाड पालिकेची स्वच्छ सर्वेक्षणात आघाडी, तर नदी स्वच्छतेत पिछाडी!
sakal

बोलून बातमी शोधा

Water Hyacinth

कऱ्हाड पालिकेने स्वच्छता अभियानसह माझी वसुंधरांतर्गत येणाऱ्या निधीतून कृष्णा नदीला जलपर्णीमुक्त करण्याची गरज आहे.

कऱ्हाड पालिकेची स्वच्छ सर्वेक्षणात आघाडी, तर नदी स्वच्छतेत पिछाडी!

sakal_logo
By
सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : स्वच्छ सर्वेक्षणात (Swachh Survekshan) सलग दोन वर्षे देशात पहिल्या क्रमांकाला, तर माझी वसुंधरा स्पर्धेत (Majhi Vasundhara Abhiyan) सलग दोन वर्षे गवसणी घालणारी कऱ्हाड पालिका (Karad Municipality) नदी स्वच्छतेत मात्र मागे पडते आहे. कोयना व कृष्णा दोन्ही नद्यांच्या स्वच्छतेची स्पर्धा झाली की, पालिकेला विसर पडला आहे. त्यामुळे कृष्णा व कोयना नद्यांच्या (Krishna and Koyna River) प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीत जलपर्णी वाढली आहे. कृष्णा नदीत स्मशानभूमीपासून कमळेश्वर मंदिर तसेच पुढे नवीन कृष्णा पुलाकडे वाढणारी जलपर्णी पालिकेच्या नदी प्रदूषणात (River Pollution) वाढ करते आहे. (Karad Municipality Is Behind In Cleaning The River Satara Marathi News)

कऱ्हाड पालिकेने स्वच्छता अभियानसह (Sanitation Campaign) माझी वसुंधरांतर्गत येणाऱ्या निधीतून कृष्णा नदीला जलपर्णीमुक्त करण्याची गरज आहे. माझी वसुंधराच्या माध्यमातून येणाऱ्या तीन कोटींतून जलपर्णी मुक्तीसाठी तरतुदी करण्याची गरज आहे. ती तरतूद पालिका करणार का, याकडे लक्ष लागून आहे. स्मशानभूमीपासून कमळेश्वर मंदिर (Kamleshwar Temple) व पुढे नवीन कृष्णा पुलाकडे (Krishna Bridge) नदीपात्रात जलपर्णी वाढली आहे. ती मोठ्या प्रमाणात पसरत आहे, वेळीच काढली नाही तर कृष्णा पाठापोठ कोयना नदीही जलपर्णीच्या विळख्‍यात सापडणार आहे. नदीपात्रातील पाणी शुध्दीकरणाची प्रक्रियाही थांबली आहे. नदीतील ऑक्सिजन जलपर्णीमुळे कमी होतो. जलपर्णीला विविध नावांनी ओळखले जाते. जलपर्णीने कोल्हापूरला पंचगंगा नदी, रंकाळा तलाव प्रदूषित केला आहे. तीच अवस्था कऱ्हाडलाही होण्याचा धोका आहे.

हेही वाचा: 'त्या' कृषी दुकानांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू

जलपर्णी (Water Hyacinth) दोन वेलींपासून केवळ १२० दिवसांत एक हजार २०० वेलींपर्यंत वाढते. २७ ते ३० अंश डिग्री सेंटिग्रेड तापमान तिच्या वाढीसाठी आवश्यक असते. दहा ते ४० अंश तापमानातही तग धरते. हिवाळा वगळता अन्य ऋतूत बहरणारी जलपर्णी धोक्याची आहे. फुलांच्या भागापासून तयार होणारी फळे पाण्यात बुडालेली असतात. त्याच्या बिया पडून पाण्यात रुजतात. त्यातून नव्या जलपर्णीचा जन्म होतो. आत्ता कऱ्हाडला वाढणारी जलपर्णी लक्ष न दिल्यास पुढे धोक्याची ठरणार आहे. त्यावर उपाय न केल्यास गतीने वाढणारी जलपर्णी थेट कऱ्हाडच्या स्वच्छतेला आव्हान ठरणार आहे.

हेही वाचा: उदयनराजेंचा संभाजी राजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

जलपर्णीचा तोटा

  • नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो

  • नदीच्या पाण्यात जाड मॅट विरघळल्याने धोका वाढतो

  • जलचर मासे, पक्ष्यांसह अन्य जिवांचेही जीवनचक्र धोक्यात येते

  • जलपर्णीमुळे डासांसह रोग पसरवणाऱ्या कीटकांची उत्पत्ती वाढते

  • रोग पसरवणाऱ्या कीटकांची प्रजनन स्थानेही वाढण्यास मदत करते

हेही वाचा: राब्ता : कृति सेनन नाही, तर आलियाच होणार होती सुशांतची 'हिरोईन'; पण..

ऐतिहासिक कृष्णा व कोयना नदीला येथे जलपर्णीचा विळखा पडू लागला आहे. जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. जलपर्णीच्या वाढीवर वेळीच उपाययोजना न केल्यास नदी व्यापून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर कऱ्हाडला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

-रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Karad Municipality Is Behind In Cleaning The River Satara Marathi News

loading image
go to top