esakal | Weekend Lockdown : कऱ्हाडात दुकानं सुरु ठेवणाऱ्यांवर धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Weekend Lockdown

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वीकेंड लॉकडाउनचे आदेश दिले आहेत.

Weekend Lockdown : कऱ्हाडात दुकानं सुरु ठेवणाऱ्यांवर धडक कारवाई

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी वीकेंड लॉकडाउनचे (Weekend lockdown) आदेश दिले आहेत. तरीही दुकाने सुरु ठेवणाऱ्यांवर पालिकेच्या पथकाने आज शहरात कारवाई करुन दंड वसूल केला. दरम्यान, पालिकेने दुकानदारांकडून काही वस्तुही जप्त केल्या आहेत. (Karad Municipality Take Action Against Shopkeepers For Violating Weekend Lockdown Satara Marathi News)

वीकेंड लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेत. मात्र, तरीही शहरात अनेक दुकाने, फळ विक्री सुरु असल्याचे शनिवारी सकाळपासून चित्र होते. त्याची दखल घेवून तातडीने पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके (Chief Officer Ramakant Dake) यांनी कारवाईचे आदेश दिले.

हेही वाचा: 'जरंडेश्वर'नंतर सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस

त्यानुसार आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे (Health Officer Milind Shinde), वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, अभिजीत खवळे, अशोक डाईंगडे, सोनू चव्हाण व अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईची मोहीम राबवली. त्यामध्ये शहरातील दोन बझार, फळे विक्रेते व अन्य दुकांनावर कारवाई करण्यात आला. संबंधितांवर कारवाई झाल्याने अन्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. शनिवारी व रविवारी आत्यावश्यक वगळता कोणीही दुकाने सुरु ठेवू नयेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

Karad Municipality Take Action Against Shopkeepers For Violating Weekend Lockdown Satara Marathi News

loading image