
सातारा : कऱ्हाड पालिका करणार मुलींच्या जन्माचे स्वागत
कऱ्हाड - शहरात एक एप्रिल २०२२ नंतर जन्माला आलेल्या मुलींच्या नावाने दोन हजारांची ठेव पावती ठेवून त्या मुलींचा सुकन्या योजनेत समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय पालिकेच्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला. त्या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्या पालिकेने अनुषंगाने १० लाखांची तरतूदही केली आहे. त्या खर्चालाही प्रशासकीय बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
देशात मुलांचा तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. त्याकरिता स्त्री जन्माचे स्वागत होऊन मुलींची संख्या वाढावी व स्त्री भ्रूण हत्या थांबाव्यात, यासाठी कऱ्हाड पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे शहरातील एक एप्रिलनंतर जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावाने पालिकेतर्फे रोख दोन हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा विचार प्रशासक रमाकांत डाके यांनी मांडला. त्याला बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानुसार एक एप्रिलनंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुकन्या योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत मुलींच्या सुकन्या योजनेअंतर्गत एक रक्कमी एका वेळी दोन हजार रक्कम आरटीजीएसद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल. त्यासाठी शहरातील कायमचे रहिवासी असलेले पालक प्रथम व द्वितीय अशा दोन मुलींसाठी सुकन्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात, असेही ठराव नमूद आहे.
Web Title: Karad Palika Will Welcome Birth Of Girl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..