
-सचिन शिंदे
कऱ्हाड : कऱ्हाड- पाटण तालुक्यांतील तब्बल २० हून अधिक मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. त्यात पुलांची कार्यक्षमता तपासण्यात येणार आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी अशीच तपासणी झाली होती. त्या अहवालात बहुतेक पूल मजबुतीचा अहवाल दिला होता. त्यानंतर पुन्हा यंदा ३० मीटरपेक्षा मोठ्या पुलांची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास त्या पुलाचेही मजबुतीकरणाचे कामही हाेणार आहे.