नारायणवाडीच्या डॉक्‍टरनंतर रेठरेच्या बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश

Fake Doctor
Fake Doctoresakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्‍टरचा (Fake Doctor) तपास करताना पोलिसांनी आणखी एका बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश केला. सुदर्शन हर्षवर्धन जाधव (Sudarshan Jadhav) (वय 26, रा. रेठरे खुर्द) असे त्यांचे नाव आहे. तपासात दुसराही डॉक्‍टर बोगस आढळल्याने खळबळ उडाली आहे. (Karad Police Arrest Fake Doctor In Rethare Khurd Satara Crime News)

Summary

नारायणवाडीची बोगस डॉक्‍टर सुवर्णा मोहितेचे पंत क्‍लिनिक याचा सुदर्शन जाधव मूळ मालक आहे.

नारायणवाडीची बोगस डॉक्‍टर सुवर्णा मोहितेचे (Suvarna Mohite) पंत क्‍लिनिक याचा सुदर्शन जाधव मूळ मालक आहे. तो रेठरे बुद्रुक परिसरात बऱ्याच वर्षापासून प्रॅक्‍टिस करत असल्याचाही प्रकार समोर आला आहे. जाधव डॉक्‍टर नसून फार्मासिस्ट आहे, तरीही डॉक्‍टर असल्याचे भासवून प्रॅक्‍टिस करत होता. त्यालाही पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नारायणवाडी येथे सुवर्णा मोहिते या बोगस डॉक्‍टरला पोलिसांनी बुधवारी अटक झाली. ती बोगस असल्याची शंका आल्याने आरोग्य व पोलिसांनी संयुक्त छापा टाकून तिचा बुरखा फाडला. तिच्या दवाखान्यात उपचार घेणाऱ्याचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात आणखी एका बोगस डॉक्‍टरचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यालाही बोगस डॉक्‍टर प्रकरणी गुन्ह्यात रात्री उशिरा अटक केली आहे.

Fake Doctor
खतांच्या दरवाढीवर खोतांचा निशाणा; शंभूराज देसाईंचं सदाभाऊंना खुलं आव्हान

सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्या पथकाने रात्री उशिरा बोगस डॉक्‍टर सुदर्शन जाधवला अटक केली. पंत क्‍लिनिक नावाने जो दवाखाना सुवर्णा मोहिते ही बोगस डॉक्‍टर चालवत होती. त्याचा मूळमालक सुदर्शन जाधव आहे. तोही बोगस डॉक्‍टर निघाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दुधभाते यांनी त्या प्रकरणात जाधवला सायंकाळी अटक केली. बोगस महिला डॉक्‍टरला चालविण्यास दिलेल्या पंत क्‍लिनिकचा जाधव मूळ मालक आहे, असे दुधभाते यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ""जाधव याच्याकडे चौकशी केली त्या वेळी तोही बोगस आहे. तो डॉक्‍टर नसून फार्मासिस्ट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक केली आहे.''

बोगस महिला डॉक्‍टरचा आणखी एक प्रताप उघडीकस; यंत्रणाही हडबडली

Karad Police Arrest Fake Doctor In Rethare Khurd Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com