बोगस महिला डॉक्‍टरचा आणखी एक प्रताप उघडीकस; पोलिस यंत्रणाही हडबडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court Order

दुर्गमसह ग्रामीण भागात डॉक्‍टरांचा वाढलेला सुळसुळाट नारायणवाडीतील कारवाईने समोर आला. आठ महिन्यांत दुसऱ्या बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश झाला. अधिकृत परवाना नाही, परिचारिकेचे अधिकृत प्रशिक्षण नसताना केवळ अनुभवाचा गैरफायदा घेत ग्रामस्थांच्या जिवाशी खेळण्याचे दुकान मांडलेले नारायणवाडीतील बोगस महिला डॉक्‍टरचे क्‍लिनिक प्रातिनिधिक आहे. अद्यापही तालुक्‍याच्या दुर्गम भागात अशा बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट आहे. त्यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे.

बोगस महिला डॉक्‍टरचा आणखी एक प्रताप उघडीकस; यंत्रणाही हडबडली

कऱ्हाड : नारायणवाडीत सापडलेल्या महिला बोगस डॉक्‍टरकडे वैद्यक परिषदेच्या (medical council) परवान्यासह परिचारिकेचेही (nurse) प्रमाणपत्र नसल्याचे पोलिस तपासात (police investigation) पुढे आले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणाही हडबडली आहे. बोगस डॉक्‍टर महिलेने कोरोनाचे सिमटर्म असलेल्यांसह अन्य रुग्णांवरही उपचार केले आहेत. त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम गुरुवारी सुरू होते. सुवर्णा प्रताप मोहिते (वय 40, रेठरे खुर्द) असे संबंधित बोगस डॉक्‍टर महिलेचे नाव आहे. तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. satara-crime-news-court-order-fake-doctor-narayanwadi-two-days-police-custody

पोलिसांनी सांगितले, की संबंधित महिला नारायणवाडी-काले येथे दोन वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काले विभागात रुग्ण वाढत होते. मृत्यूदरही वाढत आहे, अशावेळी अनेक रुग्ण नारायणवाडी येथील पंत क्‍लिनिकमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. यादव यांना मिळाली. त्यानंतर डॉ. यादव यांना पंत क्‍लिनिकबाबत शंका आली. त्यांनी त्याची माहिती घेतली असता महिला बोगस डॉक्‍टरचा सुगावा लागला.

हेही वाचा: निराधार, कष्टकऱ्यांसाठी 'आई'चा आधार, भुकेल्यांसाठी भरविला जातोय मायेनं 'आहार'

पंत क्‍लिनकवर पोलिस व आरोग्य पथकाने संयुक्तरित्या नुकताच छापा टाकला. त्या वेळी बोगस डॉक्‍टर रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळले. पोलिसांनी संबंधित बोगस डॉक्‍टर महिलेला अटक केली आहे. त्या वेळी तिने आपल्याकडे परिचारिका सर्टिफिकेट आहे, असे सांगितले होते. पोलिस तपासात तेही सर्टिफिकेट नाही, असे समोर आले आहे.

कोणत्याही वैद्यक परिषदेचा परवाना नाही, वैद्यकीय शास्त्राची परवानगी नाही, परिचारिका असल्याची दिलेली माहिती खोटी निघाल्याने पोलिस यंत्रणाही हडबडली आहे. तिच्याकडे कसून तपास केला जाणार आहे. नारायणवाडी येथील काही ग्रामस्थांचे त्या अनुषंगाने जबाबही नोंदविण्यात आले आहेत.

दुर्गम भागात बोगस डॉक्‍टर सुसाट

दुर्गमसह ग्रामीण भागात डॉक्‍टरांचा वाढलेला सुळसुळाट नारायणवाडीतील कारवाईने समोर आला. आठ महिन्यांत दुसऱ्या बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश झाला. अधिकृत परवाना नाही, परिचारिकेचे अधिकृत प्रशिक्षण नसताना केवळ अनुभवाचा गैरफायदा घेत ग्रामस्थांच्या जिवाशी खेळण्याचे दुकान मांडलेले नारायणवाडीतील बोगस महिला डॉक्‍टरचे क्‍लिनिक प्रातिनिधिक आहे. अद्यापही तालुक्‍याच्या दुर्गम भागात अशा बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट आहे. त्यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे.

नारायणवाडीतील महिला बोगस डॉक्‍टरचा गुन्हा सध्या तपासावर आहे. सापडलेल्या बोगस डॉक्‍टरला परिचारिकेचा अनुभव होता, अशी माहिती होती, तीही खोटी ठरली आहे. कोणाच्याही कारवाईची भीती न बाळगता बिनधास्त प्रॅक्‍टीस करणाऱ्या महिलेला कोणाचा वरदहस्त होता, त्याच्या सखोल तपासाची गरज आहे. उंब्रजला आठ महिन्यांपूर्वी बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश झाला होता. त्यावेळी आरोग्य विभागाचे लागेबांधे असल्याची चर्चा होती. मात्र, पुढे सरकारी पद्धतीने तपास झाला. त्यामुळे अशा बोगसगिरीवर निर्बंध लावण्यासाठी आरोग्य विभागालाच ठोस पावले उचलावी लागणार आहेत. तालुक्‍यात दुर्गम भागात अशा डॉक्‍टारांची अजूनही भरती आहे. त्यांच्यावर कारवाईचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

हेही वाचा: मधमाश्यांनाही आवडतं आईसक्रीम? त्यांचं आइसक्रीम नक्की कोणतंय? जाणून घ्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून किरकोळ आजाराला गावातील स्थानिक ओपीडीचा आधार असतो. मात्र, ती बोगस असेल तर तो जिवाशी खेळ ठरतो, हे नारायणवाडीतील प्रकाराने समोर आले आहे. नारायणवाडीत आरोग्य व पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी बोगस डॉक्‍टरची ओपीडी रुग्णांनी फुल्ल होती. काही रुग्णांना तपासून औषधे दिली जात होती. त्यात सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवरही त्या बोगस डॉक्‍टरने उपचार केले आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याच्या धोकादायक स्थितीत त्या बोगस महिला डॉक्‍टरला झालेली अटक आरोग्य विभागाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरावी.

नारायणवाडीतील बोगस महिला डॉक्‍टरकडे कोणतेच अधिकृत प्रमाणपत्र नाही. तिने परिचारिका आहे, असे सांगितले होते. मात्र, त्याचेही अधिकृत प्रमाणपत्र नाही. त्यामळे त्यामागे आणखी काही रॅकेट आहे का, याचा कसून शोध घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने तपास करत आहोत.

एस. ए. डोग, पोलिस उपनिरीक्षक, कऱ्हाड तालुका

हेही वाचा: मोहफुलाचा दारुसाठीच नाही, तर औषधासाठी देखील वापर होतो; जाणून घ्या 'मोहफुल' काय आहे?

ब्लाॅग वाचण्यासाठी क्लिक करा

loading image
go to top