
दरम्यान, संशयित गुरुवारी महामार्गावरून कर्नाटकला निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने सापळा रचून महामार्गाजवळ वारुंजी येथून संशयितांना ताब्यात घेतले. पूर्वीच्या भांडणावरून संबंधित घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे.
कऱ्हाड : येथील भाजी मंडई परिसरात मंगळवारी (ता. 22) रात्री झालेल्या खूनप्रकरणी तीन संशयितांना शहर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितामध्ये येथील माजी नगराध्यक्षांच्या मुलाचा समावेश असून, एका अल्पवयीन मुलाचाही त्यात सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे. पूर्वीच्या भांडणातून हा खून झाला आहे. याप्रकरणी अरीन फारुख सय्यद (वय 23), सईद अल्ताफ शिकलगार (वय 21) यांना ताब्यात घेण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांची माहिती अशी, येथील भाजी मंडईतील जुबेर आंबेकरी व संशयित अल्पवयीन मुलाचा मध्यंतरी ओगलेवाडी येथे वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी रात्रीही त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून रात्री साडेदहाच्या सुमारास मंडई परिसरात अरीन सय्यद, सईद शिकलगार, अल्पवयीन मुलगा व जुबेर आंबेकरी (रा. भाजी मंडईजवळ, गुरुवार पेठ, कऱ्हाड) यांची भांडणे झाली. त्यामध्ये जुबेर याच्यावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात फरशी व दांडके मारून त्याचा खून झाला. त्यानंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील संशयितांच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके पाठवण्यात आली.
पदवीधर निवडणुकीतील सेनेच्या अपयशावर जयंत पाटलांचे भरपाईचे संकेत
दरम्यान, संशयित गुरुवारी महामार्गावरून कर्नाटकला निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने सापळा रचून महामार्गाजवळ वारुंजी येथून संशयितांना ताब्यात घेतले. पूर्वीच्या भांडणावरून संबंधित घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक मारुती सराटे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख विजय गोडसे, अमित बाबर, भरत पाटील, पोलिस उपनिरीक्षक चोरगे, सहायक फौजदार राजेंद्र पुजारी, संतोष सपाटे, हवालदार विवेक गोवारकर, प्रशांत पाटील, सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, राजेंद्र देशमुख, संजय जाधव, सचिन साळुंखे, शंकर गडांकुश, गणेश वेदपाठक, नीलेश कदम, मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, आनंदा जाधव, सागर भोसले, रवी देशमुख, महेंद्र सावंत यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करत आहेत.
शिरवळ : राष्ट्रवादी काॅंग्रेस, सेनेचे कार्यकर्ते लागले कामाला; भाजपात अस्वस्था