

Friend’s Death Sparks Revenge Plan in Karad; Police Recover Firearm
sakal
कऱ्हाड : काही दिवसांपूर्वी शहरातील घटनेत निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यास कारण असलेल्या संशयिताचा खून करून त्याचा बदला घेण्याचा डाव रचणाऱ्यास पोलिसांनी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसासहीत सापळा रचून अटक केली. श्रेयस श्रीरंग पवार ऊर्फ पिल्या (रा. लिगाडे पाटील कॉलेज समोर, कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे संशयिताचे नाव आहे.