

Karad police recover stolen items after solving burglary case in SaidaPur and Agashivnagar.
esakal
कऱ्हाड: सैदापूर व आगाशिवनगर (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथे घरफोडी करून फरार झालेल्या चोरट्यास शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मिरज येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्याने चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने उद्यापर्यत (गुरुवार) पोलीस कोठडी सुनावली आहे. लोकेश सुतार (रा. मिरज) असे संबंधित संशयीताचे नाव असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.