

Maharashtra Police Viral Video Karad Police Start 112 Home Delivery Service for Senior Citizens and Women
sakal
कऱ्हाड : वय वाढते तसे शरीराची साथ कमी होत जाते. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी किंवा डॉक्टरांकडे जाण्यासही अनेक ज्येष्ठ नागरिक, महिलांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. ही गरज ओळखून कऱ्हाड शहर पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवेची मदत घरपोच देणारा उपक्रम हाती घेतला आहे.