Karad Police Raksha Bandhan: राखी बांधली हातावर; सुरक्षेचे कवच डोक्यावर; कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बहिणींसाठी कऱ्हाड पोलिसांकडुन सुरक्षेची भेट

Women Police Officers Receive Helmets as Special Gift: कऱ्हाड तालुका पोलिसांनी रक्षाबंधनानिमित्त महिला पोलिसांच्या हातावर राखी बांधून त्यांना हेल्मेट भेट दिले.
Karad Police Raksha Bandhan

Karad Police Raksha Bandhan

esakal

Updated on

कऱ्हाड: राखीचा धागा हातावर बांधला की बहिणीच्या डोळ्यांत उमटते ती विश्वासाची भावना. काहीही झाले तरी भाऊ आपल्या पाठीशी आहे, या भावनेची. याच भावनेला कऱ्हाड तालुका पोलिसांनी यंदा एक वेगळा अर्थ दिला. रस्त्यावर, बंदोबस्तात, तपासाच्या कामात आणि पोलीस ठाण्यात दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांच्या हातावर राखी बांधतानाच त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही जपली. रक्षाबंधनाची भेट म्हणून त्यांच्या हाती हेल्मेट देत तुमची काळजी घेणारे आम्हीही आहोत, असा जिव्हाळ्याचा संदेश दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com