
Karad Police seize three pistols worth ₹8.5 lakh; three suspects detained in a major operation.
Sakal
कऱ्हाड: कऱ्हाड तालुक्यातील शामगाव घाटाच्या दरम्यान तीन देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे प्लॅस्टीकचे डबीसह, दोन मोबाईल व एक चारचाकी असा सुमारे साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.