shambhuraj desai, cm devendra fadnavis and eknath shinde
sakal
कऱ्हाड - सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, कऱ्हाड, जावळी, कोरेगाव या तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांत समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांबाबतही दुष्काळी निकषांच्या आधारे निर्णय होण्याची प्रक्रिया आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.