
मलकापूर: अनोळखी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. पुणे- बंगळूर महामार्गावर गोटे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत कऱ्हाड- सातारा मार्गिकेवर रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. सागर यशवंत साळुंखे (वय ३६, रा. कमळापूर- रामापूर, ता. खानापूर, जि. सांगली) असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.