पुण्यातून येवून सातारा जिल्ह्यात गुरगुरत्यात; शहाजीबापूंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla shahajibapu patil

सातारा जिल्हा जिंकुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचा भगवा झेंडा जिल्ह्याच्या गावागावात पोहचवा. आता कोण मोठं नाही, कुणाला काय घाबरायचे नाही.

Shahajibapu Patil : पुण्यातून येवून सातारा जिल्ह्यात गुरगुरत्यात; शहाजीबापूंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला

कऱ्हाड - मंत्री शंभुराज देसाईंच्या गालावरुन त्यांच्या मातोश्रीने हात फिरवला हा मायेची उर्जा देणारा हात आहे. त्याच्या आशिर्वादाने पाटण जिंकलेले आहे. आता सातारा जिल्हा जिंकुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचा भगवा झेंडा जिल्ह्याच्या गावागावात पोहचवा. आता कोण मोठं नाही, कुणाला काय घाबरायचे नाही. पुणे जिल्ह्यातुन येवुन सातारा जिल्ह्यात गुरारुन जात्यात, हे बंद करुन आपलेच नेतृत्व सिध्द करावे. आता सातारा जिल्ह्यात आम्ही दोघ शोले करुनच दाखवतो, असा टोला आमदार शहाजीबापु पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मारला.

मंत्री शंभुराज देसाई यांच्या वाढदिनी आयोजीत कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी आणि शंभुराज देसाई कॉलेज पासुनचे मित्र आहे. पोलादी पुरुषांच्या परंपरेतील चौथी पिढी आज शंभुराज देसाईंच्या रुपाने पाटण मतदार संघासाठी कार्यरत आहेत. इतिहास घडवलेल्या सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातील एखाद्या आईने एखादे लेकरु कुशीत धरावे, तसे या पाटण तालुक्याला शंभुराज देसाईंनी धरले आहे. ते मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत. मुख्यमंत्र्यांची शंभुराजेवर मायेची पाखर आहे. त्यामुळे पाटण तालुक्याला काहीही कमी पडणार नाही.

पंढरीच्या पांडुरंगांचा आशीर्वाद घेवुन मी शंभुराजे व त्यांच्या पत्नीसाठी आलो आहे. विश्वाच्या पाठीवर अनेक नातीगोती जोडलेली असतात. त्यात आईचे नाते सर्वश्रेष्ठ आहे. शंभुराजेंच्या गालावरुन त्यांच्या मातोश्रीने हात फिरवला हा मायेची उर्जा देणारा हात आहे. त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादने तुम्ही पाटण जिंकलेले आहे, आता सातारा जिल्हा जिंकुन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचा भगवा झेंडा जिल्ह्याच्या गावागावात पोहचवा. आता कोण मोठं नाही, कुणाला काय घाबरायचे नाही, कुणाच्या काय भानगडी नाहीत. लय झालं गुरगुर करायचे लय झालं. पुणे जिल्ह्यात येवुन सातारा जिल्ह्यात गुरारुन जात्यात, हे बंद करुन आपलेच नेतृत्व सिध्द करावे.

लोकनेत्यांचे सिंहासारखे राजकारण

इतिहास घडवलेल्या सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातील काळ्या पत्थरातुन ७० वर्षापुर्वी एक वाघ डरकाळी फोडुन मुंबईला गेला, त्यांचे नाव बाळासाहेब देसाई, असे सांगुण आमदार पाटील म्हणाले, बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे ते पोलादी पुरुष ठरले. राजकारण होतात, निवडणुका येतात-जातात, खुर्च्या मिळतात, निघुन जातात. मात्र मर्दासारखे हिंमतीने सिंहासारखी डरकाळी फोडत आवाज देवुन राजकारण करणारी माणसे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहेत. त्यात पोलादी पुरुष बाळासाहेब देसाईंचे नाव घ्यावेच लागेल.