

The iron entrance gate under which the young child was fatally trapped in Karad taluka during Holi celebrations.
sakal
कऱ्हाड : घराचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडून त्याखाली सापडून दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मलकापूर येथील रिमांड होममागील कॉलनीत घडली. काल रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. विघ्नेश वल्लभ मुळे (वय दोन वर्षे, चार महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी नऊच्या सुमारास त्याच्यावर शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.