

Health Minister Prakash Abitkar Visits Karad Sub-District Hospital
sakal
कऱ्हाड : कऱ्हाड (जि.सातारा) येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यंत्री प्रकाश आबीटकर यांनी गुरुवारी रात्री अचानक भेट देवुन पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येणारे बेडशीट आणि स्वच्छतेबाबत काही सुचना केल्या. त्याची दखल घेवुन आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी तात्काळ ३०० बेडशीट येथील उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करुन दिली. त्याचबरोबर जादा कर्मचारी देण्यासाठीचीही कार्यवाही जिल्हा शल्यचिकीत्सक युवराज करपे यांनी सुरु केली आहे. त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे.