
-सचिन शिंदे
कऱ्हाड : महिलांचे बाळंतपण हा दुसरा जन्म असतो, असे म्हणतात. त्यांच्यावरील उपचारांसाठी अत्यंत काळजी घ्यावी लागते. मात्र, फारशा अद्ययावत सुविधा नसतानाही महिलांच्या सुरक्षित प्रसूती येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केल्या आहेत. नव्या प्रसूती रुग्णालयाचे काम अर्धवट असतानाही महिलांच्या प्रसूती सुरक्षेला प्राधान्य देण्याचे काम येथे होत आहे.