

Karad Leopard Incident
esakal
कऱ्हाड : साळिंदराच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना तळबीड (ता. कऱ्हाड) परिसरात समोर आली. वन अधिकारी ललिता पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. किमान दोन दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असावा. दबक्या पावलांनी शिकार करणाऱ्या बिबट्यालाच साळिंदराच्या काट्यांनी जीवघेणा धडा दिला.