

Swift Action by Karad Police; Fugitive Arrested in Pune
sakal
कऱ्हाड: पुणे-बंगळूर महामार्गावरीर गोटे(ता. कऱ्हाड) येथुन अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने पोलिसांना चकवा देत हातातील बेड्यांसह पळ काढला होता. कऱ्हाड तालुका पोलिसांच्या पथकाने संबंधित संशयीतास पुणे येथुन मध्यरात्री पकडुन त्याला ताब्यात घेतले. अनिकेत प्रकाश लोहार (वय २३, रा. कोळे, ता. कराड) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.