Sculptor Somnath Bhosale
sakal
कऱ्हाड - येथील प्रतिभावान शिल्पकार सोमनाथ सुधीर भोसले यांनी साकारलेली ११ फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. स्थानिक पातळीवर नाव कमावलेल्या श्री. भोसले यांच्या कलेची भुरळ आता परदेशीयांनाही पडू लागली असून, त्यांच्या शिल्पकलेची ख्याती सातासमुद्रापार पोचणार आहे.