Karad News : गावोगावच्या विकास सेवा सोसायट्यांवर आता सीसीटीव्हीचा वॉच; पारदर्शक कारभारासाठी उपनिबंधकांचे आदेश

गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी सर्वात मोठी संस्था म्हणजे विविध कार्यकारी सहकाही सेवा सोसायटी आहे. या संस्थेच्या माध्यमातुन कोट्यावधी रुपयांचा व्यवहार दरवर्षी केला जातो.
cctv watch
cctv watchsakal

कऱ्हाड - गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी सर्वात मोठी संस्था म्हणजे विविध कार्यकारी सहकाही सेवा सोसायटी आहे. या संस्थेच्या माध्यमातुन कोट्यावधी रुपयांचा व्यवहार दरवर्षी केला जातो. मात्र त्या पारदर्शक व्यवहाराला मध्यंतरी काही संस्थाच्या संस्थाचालकांनीच बट्टा लावल्याचे उदाहरणे समोर आली. काही सोसासट्यांत भ्रष्टाचार झाला तर काही सोसाट्यांत काळाबाजार करण्यात आल्याचे दिसुन आले.

त्याचा विचार करुन आता जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सोसायट्यातील छुपी सावकारी, बोगस कर्ज प्रकरणे आदि बाबतचा काळाबाजार थांबवण्यासाठी सातारा जिल्हा उपनिबंधकांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार आता सातारा जिल्ह्यातील ९५३ सहकारी सोसायट्यांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

सहकारी सेवा सोसायट्या स्थापन होण्याअगोदर खासगी सावकारांकडुन शेतकरी कर्ज घेत होते. त्यामुळे शेतकरी दरवर्षी सावकारी पाशात अडकलेला असायचा. त्याला सावकारी पाशातुन मुक्त करण्यासाठी गोवागावी सहकारी सेवा सोसायट्यांची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात असल्याने या सोसायट्या शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहेत.

शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात विविध कार्यकारी सोसायटीचे योगदान मोलाचे ठरले आहे. गोवागवच्या विकास सेवा सोसायट्या या गावच्या आर्थिक केंद्रे बनली आहेत. गावपातळीवर जिल्हा बॅंकाकडुन या सोसायट्या कर्ज घेवुन त्याचे शेतकऱ्यांना वाटप केले जाते.

पिकांच्या तारणावर कर्ज पुरवठा करणे, रोख रक्कम देण्याऐवजी बी-बियाणे, खते, जंतुनाशके इत्यादी वस्तूंचा पुरवठा करणे याचबरोबर शेतमालावर उचल रकमा या संस्थामार्फत दिल्या जातात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जनावरे खरेदी, कुकुटपालन, औजारांसह काही सोसासट्या गोठा बांधण्यासाठीही कर्ज देतात.

पारदर्शकतेसाठी उपनिबंधकांचे आदेश

विकास सेवा सोसायट्या जरी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत असल्या तरी त्यातुनही काहीजण राजकारण करतात. त्याव्दारे गावची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठीही अनेकदा प्रयत्न केले जात असल्याचीही उदाहरणे घडली आहेत. त्याचबरोबर काहीवेळेला छुपी सावकारी, बोगस कर्ज प्रकरणे, मयत कर्जाची प्रकरणे केली जात असल्याच्याही सहकार विभागाकडे तक्रारी झाल्या आहेत.

त्याचा विचार करुन सहकार विभागाने आता आर्थिक पारदर्शकतेसाठी जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सोसायट्यांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ९५३ सहकारी सेवा सोसायट्यांत ही यंत्रणा बसवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सहकारी सोसायट्यांतील कारभार पारदर्शक व्हावा यासाठी सर्व सोसाट्यांत सीसीटीव्ही बसवण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या सहाय्यक निबंधक, उपनिबंधक यांच्याकडुन कार्यवाही सुरु आहे. त्याची कार्यवाही लवकरात लवकर होण्यासाठी आमच्याकडुन प्रयत्न सुरु आहेत.

- मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक, सातारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com