Warunji jackwell latest news
esakal
कराड : घरातील नळाला पाणी येईल की नाही, आलेच तर किती वेळ येईल, याची चिंता कराडकरांना पुन्हा सतावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९७२ च्या तीव्र दुष्काळनंतर कराड शहराला पाणीपुरवठ्याची चणचण भासण्याची शक्यता आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वारूंजी येथील जॅकवेलचा काही भाग पाण्याबाहेर आला (Warunji jackwell water level update) आहे. त्यामुळे कोयना नदीतील घटती पाणी पातळी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने चिंतेची बनली आहे.