

Karad Politics: Ex-Mayor and Six Former Corporators from Janashakti Front Join BJP
Sakal
कऱ्हाड: कऱ्हाडमधील जनशक्ती आघाडीने अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का ठरला आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने जनशक्तीच्या दोन माजी नगराध्यक्षांसह सहा माजी नगरसेवक भाजपवासी झाले. त्यामुळे कऱ्हाड पालिकेच्या राजकारणात भूकंप झाल्याची चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार डॉ. भोसले, पक्षाचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी व जनशक्ती आघाडीचे समर्थक उपस्थित होते.